यावल दि.१६
तालुक्यातील संबंधित सर्कल,तलाठी यांनी संगनमत करून गौण खनिज वाहतुकीत तडजोड करून डंपर वाहन सोडून डंपर प्रमाणे आपला खिसा लाल केला. भुसावळ फैजपूर रोडवर कासवा फाट्यावर आज शुक्रवार संध्याकाळी ५:४५ वाजता घटना घडल्याने ते सर्कल आणि तलाठी कोण.? आणि कोणत्या मंडळातील होते आणि आहेत.? याबाबत यावल,भुसावळ तालुक्यात चर्चा आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की कासवा फाट्यावर गौण खनिज खडी / मुरूम बेकायदा वाहतूक करणारे डंपर फिरस्तीवर सोबत असलेल्या सर्कल आणि तलाठी यांनी पकडले परंतु डंपर चालक मालक सर्कल तलाठी यांनी आप- आपसात तडजोड करून ते वाहन सोडल्याची चर्चा असली तरी तडजोड करणारे करणारे आणि गौण खनिज वाहतूक करणारे डंपर यावल तालुक्यातील होते की भुसावळ तालुक्यातील होते याबाबत नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी लाल रंगाच्या डंपरचा फोटो आणि व्हिडिओ शूटिंग काढले की सुद्धा चर्चा असून त्याबाबत तक्रार केली जाणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा