यावल नगरपालीकेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सईदाबी शेख तर स्विकृत सदस्यपदी उभाठाचे अतुल पाटील,भाजपाचे उमाकांत फेगडे यांची निवड.

यावल दि.१५ 
नगरपरिषदेच्या उप नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीतील काँग्रेस गटाच्या सईदाबी शेख याकुब यांची तर स्विकृत सदस्यपदी महाविकास आघाडी तथा उभाठाचे माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे गटातुन उमाकात रेवा फेगडे यांची निवड करण्यात आली.

आज गुरुवार दि.१५ जानेवारी रोजी यावल नगरपालीकेच्या सभागृहात महाविकास आघाडीच्या लोकनियुक्त अध्यक्षां सौ.छायाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या नगरपालीकेच्या या पहील्या सर्वसाधारण सभेत सर्व नवनिर्वाचित  २३ नगरसेवक उपस्थित होते.यावेळी सभेत उप नगराध्यक्षपदाच्या निवडी करीता राष्ट्रवादी ( अजित पवार ) गटाचे अंजुम बी कदीर खान यांना ४ मते मिळालीत तर भारतीय जनता पक्षाच्या उप नगराध्यक्षपदासाठी रूबाब महमंद तडवी यांना ८ मते मिळालीत तर महाविकास आघाडी काँग्रेसच्या सईदाबी शेख मोहम्मद याकुब यांना १२ मते मिळाल्याने सईदाबी शेख उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.या सर्वसाधारण सभेचे कामकाज मुख्यधिकारी निशीकांत गवई व सहमुख्यधिकारी रविकांत डांगे यांनी निवडणुक प्रक्रीयेचे काम पाहीले.उपनगराध्यक्ष पदाची आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड झाल्यावर सभागृहाच्या बाहेर समर्थक पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने मोठा जल्लोष केला.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात