यावल दि.१३
शहराच्या ताई तथा नूतन लोकनियुक्त नगराध्यक्षां छाया ताई पाटील आपल्या नगरपरिषद कार्यक्षेत्रात गेल्या ४ ते ५ वर्षाच्या कालावधीत अनेक बांधकामे आणि २ महिन्यापूर्वी यावल शहरात ठीक ठिकाणच्या गटारीवर नवीन ढाप्याची बांधकामे ठेकेदाराने निकृष्ट बांधकाम साहित्य वापरून केली आहे. सर्व ढापे जैसे थे झाल्याचे दिसून येत आहेत. झालेल्या सर्व बांधकामांची चौकशी करून संबंधित ठेकेदारांना काळया यादीत टाकण्याची मागणी संपूर्ण यावल शहरातून होत आहे.
प्रशासकीय काळात यावल नगरपरिषद कार्यक्षेत्रात यावल नगरपरिषद मार्फत अनेक अनेक ठिकाणी बांधकामे करण्यात आली आहेत.नगरपरिषद बांधकाम विभागाने बांधकाम सुरू असताना मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे कामे करून न घेतल्याने संबंधित ठेकेदाराने आपल्या सोयीनुसार निकृष्ट प्रतीचे बांधकाम साहित्य वापरून ठीक - ठिकाणच्या गटावरील ढाप्याचे आणि इतर काही बांधकामे निकृष्ट प्रतीची केल्याने धापे आणि काही कामे पुन्हा जैसे थे झाल्याने या संपूर्ण कामांची यावल नगरपरिषद बांधकाम विभागामार्फत चौकशी करून संबंधित ठेकेदारांना काळया यादीत टाकण्याची कार्यवाही करावी अशी यावल शहरात सर्व स्तरातून मागणी होत आहे.
त्याचप्रमाणे ओला व सुका कचरा संकलन करून त्यावर योग्य ती प्रक्रिया संबंधित ठेकेदार करीत नसल्याने तसेच कचरा डेपोवर संकलन केलेला कचरा जाळून टाकला जात आहे.ओला व सुका कचरा संकलन करताना प्रत्येक प्रभागात दैनंदिन कचरा संकलन करणारी वाहने नियमित जात नसल्याने ठेकेदार आपल्या सोयीनुसार अनियमित ओला व सुका कचरा संकलन करीत आहे ठेकेदाराची वाहने किती सुरू आहेत आणि किती बंद आहेत इत्यादी चौकशी करून ठेकेदार दरमहा आपले लाखो रुपयाचे बिल नगरपालिका कार्यालयातून काढत असल्याने ठेकेदार हा शासनाच्या अटी शर्तीनुसार ओला सुका घनकचरा संकलन करून त्यावर प्रक्रिया करीत आहे किंवा कसे..? याची चौकशी करून ठेकेदाराचे पेमेंट तूर्त थांबविण्यात यावे अशी मागणी सुद्धा यावल शहरातून होत आहे. यावल नगरपरिषदेचे किती कर्मचारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहतात आणि किती बाहेर गावाहून ये जा करतात याची सुद्धा चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. त्याचप्रमाणे ५६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना कामाचे माहिती बाबतचा फलक ठेकेदाराने नेमका कोणत्या ठिकाणी लावला आहे. याची चौकशी करावी.



टिप्पणी पोस्ट करा