यावल दि.६
मराठी पत्रकारीतेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी मोलाचे कार्य करणारे मराठी पत्रकारितेचे जनक सर्वांना विश्वासात घेणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरातील मराठी पत्रकार संघाच्यावतीने तालुका अध्यक्ष संतोष शेलोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स मधील खान्देश लाईव्ह कार्यालयात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला तालुकाध्यक्ष संतोष शेलोडे उपाध्यक्ष कमलेश चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी प्रथम मराठी वृत्तपत्र दर्पण सुरू करणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यावर संघटनेचे कोषाध्यक्ष विनोद गोरधे आणि सुनील आराक यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या महान कार्याची माहिती दिली.यावेळी प्रेम परदेशी,
वसंत कोलते,शाम गोविंदा, सतिश कांबळे,किशोर शिंपी, प्रकाश पवार,शंतनु गचके,प्रशांत बोरोले, किशोर साळवे,अजर शेख, मजर शेख,जोहेब सय्यद,
विनोद सुरवाडे,मनोहर लोणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलेश चौधरी यांनी तर आभार आकाश ढाके यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप झाल्यानंतर पेढे वाटप करण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा