यावल दि.२
गेल्या वर्षभरात जळगाव जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालयात शासकीय काम करताना लाचखोरीचे व्यसन लागलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण ४५ सापळा कारवाई ७८ लाचखोर आरोपितांवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती अँटी करप्शन ब्युरो जळगाव पोलीस उपाधीक्षक योगेश जी ठाकूर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
१ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे की. सन २०२५ मध्ये ला.प्र.वि. जळगांव घटकाकडून एकुण ४५ सापळा कारवाई मध्ये ७८ आरोपीतांवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली असुन विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहे. या संपुर्ण ७४ आलोसे मध्ये जळगांव घटकाकडील वर्ग १ चे ३, वर्ग २ चे ६ , वर्ग ३ चे ३५ , वर्ग ४ चे ४, इतर
लोकसेवक १३ व खाजगी इसम १७ यांचा समावेश आहे.
सन २०२५ मध्ये जळगांव घटकाकडून विविध विभांगावर कारवाई करण्यात आलेली असुन वर्षभरात महसुल विभागात ७ कारवाई मध्ये १३ आरोपी, जिल्हापरिषद विभागात ५ कारवाई मध्ये ६ आरोपी,पोलीस विभागात ५ कारवाई मध्ये ९ आरोपी, विज वितरण विभागात ५ कारवाई मध्ये ५ आरोपी, वन विभागात ३ कारवाई मध्ये ९ आरोपी, सरपंच ३ कारवाई मध्ये ९ आरोपी, शिक्षण विभाग ४ कारवाई मध्ये ७ आरोपी मनपा १ कारवाई मध्ये २ आरोपी, महाराष्ट्र प्रदुषण महामंडळ १ कारवाई मध्ये २ आरोपी, राज्य परिवहन महामंडळ १ कारवाई मध्ये १ आरोपी,भुमी अभिलेख १ कारवाई मध्ये १ आरोपी, सार्वजनिक आरोग्य विभाग १ कारवाई मध्ये १ आरोपी, महाराष्ट्र राज्य विज निर्मिती केंद्र १ कारवाई मध्ये १ आरोपी, राज्य उत्पादन शुल्क १ कारवाई मध्ये २ आरोपी, नगरपालीका २ कारवाई मध्ये ४ आरोपी, सार्वजनिक बांधकाम विभाग १ कारवाई मध्ये १ आरोपी इतर लोकसेवक २ कारवाई मध्ये ४ आरोपी व खाजगी इसम १ कारवाई मध्ये १ आरोपी अशा विविध विभागात कारवाई केली आहे. अशा प्रकारे एकुण ४५ सापळा कारवाई मध्ये ७७ आरोपी यांना अटक करण्यात आली आहे.सन २०२४ च्या मध्ये ३७ गुन्ह्यात ६१ आरोपीतांवर यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली असुन सन २०२५ मध्ये ४५ गुन्हयामध्ये ७८ आरोपीतांवर कारवाई करण्यात आली आहे. सन २०२४ च्या तुलनेत सन २०२५ मध्ये अधिक ०८ ने वाढ झाली आहे. सदरची कारवाई मा.भारत तांगडे,पोलीस अधिक्षक ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र,नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली ला.प्र.वि.
जळगांव घटकातील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव युनिट तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही कार्यालयामध्ये कोणी शासकीय अधिकारी /कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम शासकीय काम करुन देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करीत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव कार्यालयाशी संपर्क साधुन निर्भिडपणे कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी.कार्यालयीन वेळेनंतर वा सुटीचे दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यप्रणाली बाबत व तकारी बाबत माहीती पाहीजे असल्यास खालील नमुद मोबाईल क्रमांक व दूरध्वनीवर संपर्क साधावा, महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या सोईच्या दृष्टीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यासाठी लॅन्डलाईन ते लॅन्डलाईन व मोबाईल ते लॅन्डलाईन अशी टोल फ्री नंबर १०६४ ची सेवा सुरु करण्यात आली असुन सदर क्रमांकावर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यप्रणाली संबंधी व करावयाच्या तकारी संबंधी नागरीकांनी खालील नमुद क्रमांकावर संपर्क साधावा.
पोलीस उप अधीक्षक योगेश गंगाधर ठाकुर,मोबाईल क्रमांक ला.प्र.वि. लॅन्डलाईन क्र.टोल फि लॅण्डलाईन क्रमांक ला.प्र.वि.टोल फ्रि मोबा. क्र.९७०२४३३१३१ :- ०२५७ २२३५४७७ :- १०६४ :- ७५८८६६१०६४
असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात अँटीकरप्शन ब्युरो जळगाव पोलीस उपअधीक्षक योगेश जी ठाकूर यांनी नमूद केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा