सकारात्मक दृष्ट्या आक्रमक असलेले तरुण तडफदार उभाठाचे नगरसेवक सागरकुमार चौधरी यांच्या गटाची नोंदणी.


यावल दि.१
व्यासपीठावर जाहीररित्या यावल शहराच्या विकासासाठी आणि उभाठा पक्षाची ध्येय धोरणे सांगत सत्ताधारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,आमदार जावळे यांच्या कार्यपद्धतीचा जाहीर समाचार व्यक्त करणारे यावल नगर परिषद उभाठा पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक यांनी आज आपला चार सदस्यांचा गट जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे नोंद केला.

शिवसेना उभाठा उपजिल्हाप्रमुख गोपाल चौधरी,तालुकाप्रमुख शरद कोळी,संतोष खर्चे,मनोज करणकर,पप्पू जोशी,सारंग बेहेडे, जयेश बारी,माजी नगरसेवक तुकाराम बारी,राहुल कचरे,राजू शेख,खन्ना माळी,गोलू माळी यांच्या उपस्थितीत ४ जणांचा गट नोंद करण्यात आला. 

शिवसेना ( उबाठा ) पक्ष आणि अपक्ष मिळून जिल्हाधिकारी यांच्या कडे गट नोंदणी करण्यात आली. गटनेतेपदी सागरकुमार सुनील चौधरी व उपगटनेतेपदी सौ.वैशाली निलेश बारी यांची निवड करण्यात आली.सदर गटात पक्षाच्या सौ.छाया अतुल पाटील,सागर सुनील चौधरी,सौ.वैशाली निलेश बारी व अपक्ष असलेले पराग विजय सराफ यांचा गट स्थापन करण्यात आला. या गटाबाबत आणि घटनेचे सागरकुमार चौधरी यांच्या सकारात्मक दृष्टिकोनाच्या आक्रमकतेबाबत आणि नियोजनबद्ध वकृत्व,कामाबाबत यावल शहरात राजकारणात समाधानकारकरीत्या चर्चा आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात