यावल येथील होमगार्ड व नागरी संरक्षण दल वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न. गरजू व गरीब जेष्ठ स्री- पुरुषांची केली सेवा.



यावल दि.१४
यावल येथील होमगार्ड व नागरी संरक्षण दलातर्फे वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले यात प्रामुख्याने आदिवासी पाड्यावर आदिवासी महिला व पुरुष गरजू व्यक्तींना आणि वृद्धाश्रमातील वृद्ध स्त्री-पुरुषांना थंड वातावरणाचा त्रास होऊ नये म्हणून ब्लॅंकेट वाटप करून त्यांना अल्पहार दिला. यासोबत संपूर्ण यावल शहरातून होमगार्ड पथकाने पथसंचलन करून समाज हिताचे व जन जागृतीचे विविध उपक्रम राबविले.

अप्पर पोलिस अधिक्षक तथा जिल्हा समादेशक होमगार्ड अशोक नखाते यांच्या आदेशान्वये व प्रशासकीय अधिकारी रामनाथ काळे सर केंद्रनायक गंगाधर महाजन, सामग्री प्रबंधक सुभेदार मदन रावते सर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समादेशक अधिकारी विजय जावरे यांनी ७९ वा होमगार्ड वर्धापन दिना निमित्त आपल्या कार्यक्षेत्रात विविध कार्यक्रम घेतले.

यात प्रामुख्याने यावल शहरातून भव्य पथसंचलन करण्यात आले. येथील यशोदायी फाउंडेशन वृद्धाश्रम या ठिकाणी वृद्ध व्यक्तींना थंडीचे ब्लॅंकेट व अल्पहार वाटप करण्यात आला,आदिवासी पाड्यावर महिला व पुरुष गरजू व्यक्तींना थंडीचे ब्लॅंकेट फळवाटप करण्यात आले,तसेच लहान मुलांना खाऊवाटपचा कार्यक्रम घेण्यात आला. वर्धापन दिन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडणे कामी तालुका समादेशक अधिकारी विजय जावरे,वरिष्ठ पलटण नायक पंकज फिरके,अनायुक्त अधिकारी ज्योती बारी,भगवान पाटील, संगीता पाटील,अर्चना कोळी,निशा कदम,
कैलास लावणे, टेकचंद फेगडे,प्रवीण तेली,सोनल कोळी, मुमताज चिखलीकर,रऊफ खान, वसीम उद्दीन,सागर पाठक,अशोक बडगुजर,संतोष बारी,
संदीप कोळी तसेच सर्व महिला पुरुष होमगार्ड पथकाने सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात