यावल शहरातील राजकारणात गुंडगिरीचा प्रवेश झाल्याने समाजासह राजकारणाला मोठा धोका. पोलिसांच्या गोपनीय विभागाला मोठे आव्हान.


यावल दि.३
यावल शहरासह तालुक्याचा गेल्या २५ ते ३० वर्षाचा राजकीय,सामाजिक क्षेत्रासह लोकसभा,विधानसभा
,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा आढावा लक्षात घेतलाअसता निवडणुकीत कधीही कोणत्याही राजकीय पक्षातर्फे समाजात मतदारांमध्ये,पदाधिकारी,कार्यकर्त्यांना गुंडगिरी,
दादागिरीचा प्रभाव दाखविण्यात आलेला नाही परंतु नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत राज्यस्तरीय एका जबाबदार लोकप्रतिनिधींने आपली पक्षाची ध्येय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बाहेरगावची मॅन पावर( साम-दाम-दंड-भेद यशस्वी करण्यासाठी ) वापरल्याने भविष्यातील समाजकारणाला राजकारणाला मोठा धोका निर्माण झाला असल्याची चर्चा यावल शहरासह तालुक्यात असल्याने गुन्हेगारीचा प्रभाव वाढणार असल्याने पोलिसांच्या गोपनीय विभागाला फार मोठे आव्हान आहे.

काल मंगळवार दि.२ रोजी यावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर यावल शहरात ठिकठिकाणी अनेक अनेक मुद्द्यावर आणि विषयावरच्या चर्चा ऐकल्या असता यावल शहरात सोमवार दि.१ रोजी सकाळपासून यावल तालुक्याच्या बाहेरील १०० ते १५० तरुणांचे संघटन यावल शहरात दाखल झाले होते,हे संघटन कोणाचे आणि कशासाठी,आणि कोणावर प्रभाव टाकण्यासाठी दाखल झाले हे सर्व सामान्य नागरिकांना मतदारांना समजले असले तरी सत्तेपुढे राजकारणामुळे आणि शासनामुळे कोणाचे शहाणपण चालत नाही या उद्देशाने ९० % यंत्रणा आणि नागरिक मतदार गप्प बसले असले तरी भविष्यात सर्व समाजाला,राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी,पदाधिकारी,कार्यकर्ते,मतदार, नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला असून या पासून जिल्हा पोलीस गोपनीय विभागाने या हालचालीची नोंद आपल्या गोपनीय / दप्तरी भागात नोंद करायला पाहिजे अशी सुज्ञ नागरिकांची मागणी होत आहे.आणि याची नोंद करून गोपनीय पद्धतीने चौकशी कारवाई न झाल्यास भविष्यातील,कायदा सुव्यवस्था,जातीय सलोखा, निवडणुकीतील समाजातील शांततेचा भंग झाल्यास पोलिसांचा गोपनीय विभाग जबाबदार राहील याची नोंद वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी सर्व स्तरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा आहे.


स्थिर सर्वेक्षण पथक ठरले निष्क्रिय - - 

निवडणूक आयोगाच्या तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात नगरपरिषद कार्यक्षेत्रामध्ये सार्वत्रिक निवडणुकी निमित्त स्थिर सर्वेक्षण पथक नियुक्त करण्यात आले होते.असे स्थिर सर्वेक्षण पथक व्हिडिओ कॅमेरा शूटिंगसह असताना यावल शहरात बाहेरगावचे १०० ते १५० पदाधिकारी कार्यकर्त्यांचे अनोळखी पथक दाखल झाले कसे.? सर्वेक्षण पथकाने काय पाहणी काय तपासणी केली..? स्थिर सर्वेक्षण पथकाने सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांची तपासणी करून कर्तव्य केल्याची चमकोगिरी,आणि देखावा केला का..? याबाबत समाजात मतदारांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात