यावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक नुकतीच संपली निवडणुकीत अनेक उमेदवाराच्या विजयासाठी काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपल्या खास पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विश्वासातल्या उमेदवारांना विजय करण्यासाठी ( एक ते साडे तीन हजाराची ) मोठ्या प्रमाणात आर्थिक वाटप केली होती आणि आहे,मदत केल्यानंतर मतदारांना प्रत्यक्ष त्याचा लाभ किती झाला.? वाटप कोणी कशी पूर्ण केली की अपूर्ण..? काही उमेदवार पराभूत का झाले..? आणि काही पराभूत उमेदवार तर आपल्या प्रभागातील अनेक मतदारांना भेटून दिलेल्या आर्थिक रकमेची / फुलीची,
परत मागणी करीत आहे.काही ठराविक पक्षाचे नेतेमंडळी आपल्या यंत्रणेकडून आर्थिक हिशोब घेत असल्याची 90 टक्के मतदार, नागरिक राजकारणाबाबत विचार मंथन करून चविष्ट चर्चा करीत आहे.
नगरपालिकेच्या राजकारणात दोघेही पती-पत्नी नको हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणि देशातील राज्यातील राजकीय प्रभाव,लोकप्रियता आणि नेत्यांवरची दडपशाई,कायदेशीर कारवाईचे कारस्थान,हिंदुत्वाचा मुद्दा,जातीपातीचे राजकारण इत्यादी धाक दाखविण्याचे प्रकार लक्षात घेऊन वाजवीपेक्षा जास्त ओव्हर कॉन्फिडन्स दाखविल्याने लोकनियुक्त अध्यक्ष पदाची जागा गमवावी लागल्याची चर्चा सर्व स्तरातील नागरिकांमध्ये मतदारांमध्ये आहे.
एका प्रभागात माजी नगराध्यक्ष यांचा राजकीय आणि वैयक्तिक काटा काढण्यासाठी एका माजी नगरसेवकाने सरळ औरंगाबाद येथून "आरोओ" पाणीपुरवठा केल्याने कमळ ' फुलले' आणि पाणीपुरवठा झाला नसता तर मशालच्या उष्णतेमुळे "कमळ" कोमजले असते अशी सुद्धा चर्चा यावल शहरात आहे.



टिप्पणी पोस्ट करा