यावल दि.२६
यावल येथील डॉ.ललिता पांडुरंग नेरकर यांनी जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून गणित विभाग,गणित शास्त्र प्रशाला (Mathematics) या विषयात पीएच.डी.(डॉक्टरेट) पदवी यशस्वीरीत्या संपादन केली आहे.
त्यांचा संशोधन प्रबंध “Study of Derivations on Γ-Semihyperring” या विषयावर आधारित असून हे संशोधन प्रा. किशोर एफ.पवार,संचालक,गणित शास्त्र प्रशाला (School of Mathematical Sciences) यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले.
या संशोधन कार्यासाठी प्रा.एच. एल.तिडके (गणित विभाग प्रमुख), प्रा.एस.आर.चौधरी,तसेच प्रा.सी. टी.आगे,गणित विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.तसेच प्रशालेतील इतर प्राध्यापक,प्राध्यापकेत्तर व प्रशासकीय कर्मचारीवर्ग यांचेही सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ.ललिता नेरकर या NET–SET (गणित) परीक्षा सुद्धा उत्तीर्ण आहेत.
डॉ.ललिता नेरकर या पांडुरंग गोपाळ नेरकर व सौ.सुनिता पांडुरंग नेरकर,यावल यांच्या कन्या असून, त्यांच्या शैक्षणिक यशामध्ये कुटुंबीयांचे भक्कम पाठबळ व सातत्यपूर्ण सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुटुंबीय,नातेवाईक,शिक्षकवर्ग, मित्रपरिवार व शुभेच्छुकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा