बाल संस्कार माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न.



यावल दि.२४ 
येथील बाल संस्कार माध्यमिक विद्यालयांची हिवाळी शैक्षणिक सहल दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी चंदनपुरी,चांदवड,नाणे संग्रहालय नाशिक,फाळके स्मारक,पंचवटी, पांडवलेणी,स्वामिनारायण मंदिर, काळाराम मंदिर या ठिकाणी संपन्न झाली.नाणे संग्रहालयामध्ये मुलांनी प्राचीन नाणे तसेच विविध वस्तू विनिमय पद्धती,प्राचीन वास्तू प्रतिकृती यांची
ओळख करून घेतली.जीवाश्म,समुद्री जीवाश्म यांची माहिती मिळविली. स्वामीनारायण मंदिरामध्ये मंदिराच्या कोरीव कामांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले.विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद घेतला.सहलीच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक ए.एम.गर्गे सर,एल.व्ही.चौधरी सर, एन.ए.बारी सर,
एस.डी.देशमुख सर,के. एम.लोंढे सर,सौ.अंजली कवडीवाले मॅडम,एम.एस.अट्रावलकर,दीपक सपकाळे आणि सुनील सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात