यावल दि.४
द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संस्थापक बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हाध्यक्ष आयु.
प्रमिला किशोर भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनात जळगाव जिल्हा कमिटीच्या अंतर्गत यावल तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली त्यात यावल तालुका अध्यक्षपदी तालुक्यातील म्हैसवाडी येथील किरण पांडव यांची नियुक्ती करण्यात आली.
आमोदा येथील साकेत बुद्ध विहार येथे निवड प्रक्रिया पार पडली असून जळगाव जिल्हा कमिटीच्या अंतर्गत यावल तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली.बैठकीची प्रस्तावना आयु.मनीष शशिकांत साबळे जिल्हा मीडिया समन्वयक यांनी सादर केली.आयु.प्रमिला किशोर भालेराव जिल्हाध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले.सदर प्रसंगी आयु. किशोर रामदास भालेराव जिल्हा कोषाध्यक्ष आयु.किर्ती मनीष साबळे भुसावळ तालुका कोषाध्यक्ष,आयु.हरिचंद्र देवचंद इंगळे भुसावळ तालुका सहकोषाध्यक्ष तसेच यावल तालुक्यामधील उपासक उपासिका उपस्थित होते.यावल तालुका कार्यकारणी पुढीलप्रमाणे - किरण गोपाळ पांडव -अध्यक्ष,मनीषा संदीप तायडे -उपाध्यक्ष,कैलास भास्कर भालेराव- उपाध्यक्ष,रेखा संजय सदावर्ते-सचिव,पंचशीला विजय भालेराव सहसचिव,ज्योती सुनील केदार-मुख्य संघटक,संदीप भगवान तायडे कोषाध्यक्ष,कल्पना पितांबर तायडे -सहकोषाध्यक्ष, छाया किरण पांडव-संघटक, शशिकांत अशोक पारधे-सह संघटक,सगुणाबाई सुधाकर तायडे सदस्य,सुमनबाई भगवान तायडे सदस्य,सुमनबाई शिवाजी तायडे सदस्य याप्रमाणे सन २०२५ ची यावल तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली.अशी माहिती जळगाव जिल्हा मीडिया समन्वयक मनीष शशिकांत साबळे यांनी दिली.



टिप्पणी पोस्ट करा