जळगाव येथे आदिवासी विकास विभागाच्या भव्य विभागस्तरीय क्रीडा महोत्सवाची यशस्वी सांगता

यावल दि.१९ 
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आदिवासी विकास विभाग नाशिकच्या भव्य विभागस्तरीय क्रीडा महोत्सवाची दि. १८ डिसेंबर रोजी यशस्वी सांगता झाली . कोणतेही गालबोट न लागता अतिशय निकोप वातावरणात हा तीन दिवसीय विभागस्तरीय क्रीडा महोत्सव पार पडला.
बक्षिस वितरण व समारोपप्रसंगी आदिवासी विकास विभाग नाशिकचे अपर आयुक्त दिनकर पावरा,उपआयुक्त अरुणकुमार जाधव,सहायक आयुक्त निलेश अहिरे,विद्यापीठाचे उपकुलसचिव वसंत वळवी,नंदुरबार प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार,धुळे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, कळवण प्रकल्प अधिकारी नवनाथ जानगर,सहायक प्रकल्प अधिकारी अनिल महाजन (नाशिक आयुक्तालय ) नितीन भामरे ( तळोदा प्रकल्प ),पवन सोनवणे ( धुळे प्रकल्प ),नाशिक अपर आयुक्त कार्यालयातील  सहायक प्रकल्प अधिकारी देवेंद्र पाटील, हर्षवर्धन नाईक,निंबा कापडणीस, सुनील नेरकर,सहायक प्रकल्प अधिकारी आर.एस.साबळे ( कळवण प्रकल्प ),अंबादास बागुल ( राजूर प्रकल्प )यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.समारोप समारंभाचे प्रास्ताविक यावल प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले तसेच अध्यक्षीय भाषणात अपर आयुक्त दिनकर पावरा यांनी प्रत्येक आश्रमशाळेत क्रीडा शिक्षक देण्याची घोषणा केली.
या ३दिवसीय विभागस्तरीय क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी विकास विभाग नाशिकचे अपर आयुक्त दिनकर पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली यजमान असलेल्या यावल प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार,सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे ,पवन पाटील,संदीप पाटील,जावेद तडवी,मिनाक्षी सुलताने,लेखाधिकारी दिपकांत वाघ,कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र मुसळे,एल.एम. पाटील,विश्वास गायकवाड,मिलिंद पाईकराव,विविध समित्यांचे प्रमुख व सदस्य,नाशिक विभागांतर्गत येणाऱ्या विविध प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग,आश्रमशाळांचे मुख्याध्यापक,क्रीडा शिक्षक, अधिक्षक,
अधिक्षिका,गृहपाल,वर्ग चार कर्मचारी या सर्व घटकांनी परिश्रम घेतले .
या विभागस्तरीय क्रीडा महोत्सवात १४ वैयक्तिक क्रीडा प्रकार व ६ सांघिक क्रीडा प्रकारांत एकूण ३०४४ आदिवासी खेळाडू विद्यार्थ्यांसह ४७२ कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.सर्वसाधारण विजेतेपद कळवण प्रकल्पाला तर सर्वसाधारण उपविजेतेपद धुळे प्रकल्पाला प्राप्त झाले.नाशिक विभागातील सात प्रकल्पांमध्ये स्पर्धेचा यजमान असलेल्या यावल प्रकल्पाने गुणांकनानुसार तृतीय क्रमांक पटकावला.शांतपणे प्रदर्शन केल्याबद्दल राजूर प्रकल्पाला देखील फेयर प्ले ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.सांघिक स्पर्धेत मुलामुलींच्या १४ वर्षे, १७ वर्षे, १९ वर्षे अशा तिन्ही गटात विजयी व उपविजयी संघाला एकेक ट्रॉफी अशा एकूण ६८ ट्रॉफी तर वैयक्तिक स्पर्धेसाठी प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंसाठी एकेक मेडल असे एकूण १९२ मेडल पारितोषिक म्हणून मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले . या विभागीय क्रीडा महोत्सवाच्या तीनही दिवसाचे थेट प्रक्षेपण युटूबवर प्रसारीत करण्यात आले .
         १४ वर्षे वयोगटाच्या मुलांच्या खो खो स्पर्धेत यावल प्रकल्प विजयी तर नंदुरबार प्रकल्प उपविजयी,कबड्डी स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर यावल प्रकल्प उपविजयी,हॉलीबॉल स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर यावल प्रकल्प उपविजयी, हॅण्डबॉल स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर नाशिक प्रकल्प उपविजयी, १४ वर्षे वयोगटाच्या मुलींच्या खो खो स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर नंदुरबार प्रकल्प उपविजयी,कबड्डी स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर तळोदा प्रकल्प उपविजयी, हॉलीबॉल स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर तळोदा प्रकल्प उपविजयी,हॅण्डबॉल स्पर्धेत नंदुरबार प्रकल्प विजयी तर कळवण प्रकल्प उपविजयी, १७ वर्षे वयोगटाच्या मुलांच्या खो खो स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर यावल प्रकल्प उपविजयी,कबड्डी स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर यावल प्रकल्प उपविजयी, हॉलीबॉल स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर यावल प्रकल्प उपविजयी,हॅण्डबॉल स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर नाशिक प्रकल्प उपविजयी,१७ वर्षे वयोगटाच्या मुलींच्या खो खो स्पर्धेत नंदुरबार प्रकल्प विजयी तर कळवण प्रकल्प उपविजयी,कबड्डी स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर कळवण प्रकल्प उपविजयी,
हॉलीबॉल स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर कळवण प्रकल्प उपविजयी,हॅण्डबॉल स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर नाशिक प्रकल्प उपविजयी,१९ वर्षे वयोगटाच्या मुलांच्या खो खो स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर यावल प्रकल्प उपविजयी,कबड्डी स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर धुळे प्रकल्प उपविजयी,
हॉलीबॉल स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर नंदुरबार प्रकल्प उपविजयी , हॅण्डबॉल स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर नंदुरबार प्रकल्प उपविजयी,१९ वर्षे वयोगटाच्या मुलींच्या खो खो स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर नंदुरबार प्रकल्प उपविजयी,कबड्डी स्पर्धेत नाशिक प्रकल्प विजयी तर कळवण प्रकल्प उपविजयी,हॉलीबॉल स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर धुळे प्रकल्प उपविजयी,हॅण्डबॉल स्पर्धेत नाशिकर प्रकल्प विजयी तर धुळे प्रकल्प उपविजयी ठरले .

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात