यावल दि.१७
यावल शहर महाविकास आघाडी तसेच शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे सर्व शाखा प्रमुख आणि सर्व पदाधिकारी,महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कळविण्यात येते की उद्या गुरुवार दि.१८ रोजी दुपारी ४ वाजता यावल नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ ब मधील आपले महाविकास आघाडीतील शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे अधिकृत आणि मतदाराचे आवडते उमेदवार सागरकुमार सुनील चौधरी यांच्या ८ ब प्रभागात मतदारांच्या माहितीसाठी प्रचंड महारॅलीचे आयोजन महाविकास आघाडीचे मार्गदर्शक हाजी शब्बीरखान शेठ,सौ.ललिता अनिल चौधरी सौ. छाया अतुल पाटील,अतुल भाऊ पाटील,यांच्या उपस्थितीत महा रॅली काढणार आहोत.तसेच सदर रॅली यावल शहरातील मेन रोडवरील सागरकुमार चौधरी यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयापासून निघणार आहे तरी महाविकास आघाडीतील घटक पक्ष्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन
शरद कोळी ( तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ),जगदीश कवडीवाले ( शहर प्रमुख,शिवसेना ( ऊबाठा ) यावल हाजी हकीम शेठ ( शहराध्यक्ष,काँग्रेस )यावल अन्सार शेठ, ( शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार ) यावल तसेच सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा