यावल दि.१३
रावेर विधानसभा मतदारसंघाचे यावल तालुक्यातील आमदार अमोल जावळे हिवाळी अधिवेशनात व्यस्त असल्याने आणि यावल तालुक्यातील ७५ टक्के जबाबदार अधिकारी कर्मचारी हे आपल्या मुख्यालयाच्या बाहेर राहत असल्याने आणि राजकीय पक्षाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते हे व्हाट्सअप ग्रुपवर आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या कामकाजाबाबत बढाईकी मारीत चमकोगिरी करीत असल्याने दुसरीकडे तालुक्यात प्रत्यक्षात होत असलेली अनेक कामे आणि यावल भुसावळ रस्त्याची डाग- डूजी सुद्धा निकृष्ट दर्जाहीन होत आहे, आणि बऱ्हाणपूर अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गावर वृक्षतोड सर्रासपणे सुरू असल्याने याकडे मात्र सत्ताधारी विरोधी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने मतदारांमध्ये नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
यावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी,विरोधी पक्षाने आपली प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबविली यात प्रिंट मीडिया प्रसिद्धी माध्यमांमार्फत आरोप प्रत्यारोप झाले नसले तरी पक्षाच्या काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या व्हाट्सअप, फेसबुक वरून एकमेका विरुद्ध चांगलेच तोंडसुख करून आम्ही किती कर्तव्यदक्ष आहोत हे फेसबुक व्हाट्सअप पाहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आणून दिले आणि त्याबाबत ठिकठिकाणी चर्चा सुरू आहे.परंतु वेळ निघून गेल्यानंतर चर्चेला काय अर्थ..? प्रचार यंत्रणेत आणि मतदान प्रक्रियेत मतदाराची किंमत मत दानाच्या फूलीच्या माध्यमातून लावल्याने यालाच यांची लोकप्रियता म्हणतात का..? अशी सुज्ञ नागरिकांमध्ये चर्चा आहे.
गेल्या दोन दिवसापासून यावल भुसावळ रस्त्याचे डाग - डूजीचे काम निकृष्ट दर्जाचे आणि दर्जाहीन होत आहे रस्त्यावर जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे बुजविण्याचे बोगस निकृष्ट दर्जाचे काम होत आहे यासोबत लहान-मोठे खड्डे जे पडले आहे पुन्हा आठ दिवसानंतर ते खड्डे मोठे होतील ते कोण बुजविणार जे खड्डे बुजविण्याचे काम होत आहे त्यावर रोलर फिरविले जात नसल्याने ठेकेदाराचा अज्ञानीपणा दिसून येतो तसेच रस्त्याचे कामकाज व्यवस्थित होत आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी प्रत्यक्ष आढळून येत नसल्याने ठेकेदाराला त्याच्या सोयीनुसार काम करण्याचे अधिकार दिलेले आहेत का..? असा प्रश्न उपस्थित होत आहे याचे बिल कोणत्या अटी शर्तीनुसार आणि कामाच्या इस्टिमेटनुसार काढले जाईल यात कोणाकोणाचे हितसंबंध आहेत.? रस्त्याच्या साईट पट्ट्याचे काम केव्हा होणार तसेच रस्त्याच्या आजूबाजूची काटेरी झाडे कोण काढणार.,?
बऱ्हाणपूर अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गाला तथा यावल चोपडा रोडला लागून असलेल्या काही वृक्षाच्या फांद्या तोडण्याचे काम वृक्ष तोडणाऱ्या एका ठेकेदाराला दिले असले तरी ठेकेदार प्रत्यक्ष जिवंत वृक्षाची कर्तल करून आपली चांदी करून घेत आहे या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचा किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही अधिकारी कर्मचारी उपस्थित नसताना वृक्षतोडीचे काम जोमात सुरू आहे याकडे महसूल विभाग आणि वनविभागाची सुद्धा अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे या सर्व बाबीकडे आमदार अमोल जावळे यांनी लक्ष केंद्रित करून यावल तालुक्यातील कोणकोणते अधिकारी कर्मचारी हे आपल्या मुख्यालयाच्या बाहेर राहतात याची प्रथम चौकशी करून शासकीय कामकाजात नियमितपणा कसा येईल आणि उत्कृष्ट, दर्जेदार प्रतीचे कामे कसे होतील तसेच दर्जाहीन कामे करणाऱ्यांवर कारवाई काय होणार याबाबत कार्यवाही करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा