पं.स.ग्रा.गृहनिर्माण अभियंता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. गुन्हा दाखल.


यावल दि.३ 
घरकुलचा दुसरा हप्ता जमा करणे करता १० हजार रुपये लाचेची मागणी करणारा पंचायत समिती मधील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता ( कंत्राटी ) तसेच त्याचा खाजगी पंटर / इसम जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,
तक्रारदार यांना सन २०२४ - २०२५ या ब्लॉकमध्ये पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) या योजने
अंतर्गत घरकुल मंजुर झालेले आहे सदर योजनेतुन घरकुलचा पहीला हप्ता दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी रूपये १५,०००/- त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेला असुन,त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे घराचे काम केलेले आहे.त्यांना मंजुर झालेल्या घरकुलचा दुसरा हप्ता जमा झाला नसल्याने,त्याबाबत विचारपुस करण्यासाठी पंचायत समिती धरणगाव येथे गेले असता सदर घरकुल संबंधित काम करणारे इंजिनियर गणेश संभाजी पाटील यांना भेटुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सध्या निधी नसल्याचे सांगितले.परंतु त्यांचे गावातील लोकांकडुन माहीती मिळाली की, त्यांचा घरकुलचा दुसरा हप्ता जमा झालेला आहे.म्हणुन तक्रारदार दि. ८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास धरणगाव येथील पंचायत समिती येथे जावुन पुन्हा गणेश पाटील यांची भेट घेवुन घरकुलचा दुसरा हप्त्याबाबत विचारपुस केली.तेव्हा गणेश पाटील यांनी घरकुलचा दुसरा हप्ता जमा करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रूपये लाचेची
मागणी केले बाबत त्यांनी दि.१४ जुलै २०२५ रोजी ला. प्र. वि.जळगाव घटकाचे सापळा पथकाकडे तक्रार लिहून दिली होती.सदर लाच मागणी तकारीची दि. १४ जुलै २०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता लोकसेवक गणेश पाटील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, पंचायत समिती धरणगाव यांनी तक्रारदार यांच्या पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) या अंतर्गत मंजुर असलेल्या घरकुलाची दुसन्या हप्त्याची रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष १०हजार रूपये लाचेची मागणी केली.तसेच दि.१६ जुलै २०२५ रोजी सागर कोळी याचे मोबाईल फोनवरून सदरची लाच रक्कम
सागर कोळी यांचे मार्फतीने स्विकारण्यास संमती दिली तसेच सागर कोळी (खाजगी इसम) याने लाचेची रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शवून प्रोत्साहन दिले, म्हणून लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक भारत तांगडे,अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी,सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पर्यवेक्षण अधिकारी म्हणून जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर यांच्यासह त्यांचे सापळा अधिकारी पोना बाळू मराठे,पो.कॉ.राकेश दुसाने,प्रणेश ठाकूर,सचिन चाटे यांनी केली. 
जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याशी संपर्क करावा त्यांचा टोल फ्री क्रमांक १०६४ आणि दूरध्वनी क्रमांक ०२५७ २२३५ ४७७ आणि व्हाट्सअप नंबर ७५ ८८ ६६ १० ६४ असा आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात