यावल दि.६
मंत्री सावकारे यांच्या भुसावळ जंक्शन शहरातील जामनेर रोडवरील सिंधी कॉलनी परिसरात भुसावळ नगरपालिका तर्फे स्री -पुरुषांसाठी बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे दोन्ही मुख्य प्रवेशद्वार कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी जागा बळकविण्याच्या उद्देशाने आणि दादागिरीने लोखंडी पत्रे लावून पूर्णपणे बंद केल्याने त्या परिसरातील शासनाच्या लाडक्या बहिणी आणि भावांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की भुसावळ शहरात
हे शौचालय जामनेर रोडपासून अवघ्या १० मीटर अंतरावर एका रोहित्रा जवळ आहे.स्थानिक अनेक स्री आणि पुरुषांच्या मते,काही भूमाफिया या जागेवर डोळा ठेवून जागा बळकाविण्याच्या उद्देशाने शौचालयाचे दोन्ही प्रवेशद्वार बंद करून टाकल आहेत.शौचालय बंद झाल्याने परिसरातील महिला,
ज्येष्ठ नागरिक आणि मजूर वर्गाची ( म्हणजे शासनाने मोठा गाजावाजा करून मानलेल्या बहिण - भावांची ) मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.सकाळी व संध्याकाळी शौचालयाची गरज असणाऱ्या स्री - पुरुषांना आता रस्त्यालगत गुड मॉर्निंग पथकाला जाहीर आव्हान करीत उघड्यावर शौचास करण्यास जावे लागणार असल्याने विद्यमान मंत्री महोदयाच्या भुसावळ जंक्शन मध्ये आरोग्याचा व नैतिकतेचा, शासकीय अधिकाराचा, राजकीय सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे.या प्रकरणाची अद्याप भुसावळ नगरपालिका प्रशासनाला माहिती मिळाली नसल्याचे दिसून येत आहे.सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने नगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे याबाबत कोणतीही तक्रार नोंदवली गेलेली नाही, कोणी तक्रार दिली असती तर कारवाई झाली असती ( परंतु भुसावळ नगर परिषदेचे याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे सुद्धा बोलले जात आहे ) अशी चर्चा त्या परिसरात आहे,परिसरातील सुजाण लोकप्रतिनिधी,पदाधिकारी कार्यकर्ते समाजसेवक या प्रकाराकडे तात्काळ लक्ष देऊन बंद केलेले प्रवेशद्वार तथा पत्रे हटवून व शौचालय पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.तसेच जागा बळकावण्याचा कट रचणाऱ्या दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
आता भुसावळ नगरपालिका प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देते आणि या जागेच्या सुरक्षतेसाठी काय कार्यवाही करणार.? याकडे भुसावळकरांचे लक्ष लागून आहे.



टिप्पणी पोस्ट करा