इन्स्टाग्रामवर शिवीगाळ करण्याचा व्हिडिओ टाकल्याने जळगाव येथील विक्रम सोनवणे राहुल सोनवणे यांनी तुषार तायडे यांस मारहाण केल्याने मृत्यू. यावल तालुक्यात घडली घटना.



यावल दि.३
जळगाव येथील विक्रम पंडित सोनवणे,राहुल शांताराम सोनवणे यांच्या विरोधात जळगाव येथील समतानगर मधील बौद्ध वाड्यातील तुषार चंद्रकांत तायडे याने व त्याच्या मित्रांने इन्स्टाग्रामवर शिवीगाळ करण्याचा व्हिडिओ बनवून टाकल्याने त्याचा राग मनात येऊन विक्रम सोनवणे,राहुल सोनवणे व त्याचे सोबत असलेल्या ६ ते ७ जणांनी मिळून तुषार तायडे यास यावल तालुक्यात यावल ते शेळगाव बॅरेजकडे रोडने यावल शिवारातील पाटाजवळ मारहाण केली त्याला मारहाणीत झालेल्या गंभीर दुखातीमुळे तो मरण पावला.

या कारणावरून मयत तुषार तायडे याचे वडील चंद्रकांत वामन तायडे रा.जळगाव समतानगर,बौद्धवाडा यांनी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की

तुषार चंद्रकांत तायडे वय १९ हा आपल्या कुटुंबीयांसह यावल तालुक्यातील परसाडे येथे आजीच्या अंत्यसंस्कारासाठी आला होता मंगळवार दि.१ रोजी संध्याकाळी ७ वा.सुमारास माझी सासु विमल शंकर भालेराव मयत
झाल्याने तिचा अंत्यविधी हा काल सकाळी १० वाजता यावल तालुक्यातील परसाडे येथे करणार असल्याचे समजल्याने माझा मोठा
मुलगा नितीन सुन,व अक्कड सासु विद्याबाई गेंदा सोनवणे, नितीनची सासु सरला राजेश भालेराव असे दि.१ रोजी बसने जळगाव येथुन परसाडे येथे आले होते.मी काल बुधवार दि.२ रोजी सकाळी ७ वा. सुमारास जळगांव येथुन भाड्याच्या रिक्षाने यावल तालुक्यात परसाडे येथे आलो होतो.माझ्या मागे लहान मुलगा तुषार चंद्रकांत तायडे हा त्याचा मित्र अजय उर्फ अक्षय सुरेश लोखंडे यांची बजाज पल्सर कंपनीची मोटार सायकल क्र.एम. एच.१९ ईडी.८८७९ हीचे ने परसाडे येथे आलेला होता.माझ्या सासुच्या प्रेतावर बुधवार दि.२ रोजी सकाळी ११ वा.सुमारास अंत्यविधी झाल्यानंतर माझा मोठा मुलगा नितीन चंद्रकांत तायडे,सुन पल्लवी हे बसने जळगांव येथे दुपारी ३ वा. सुमारास निघाले व लहान मुलगा तुषार चंद्रकांत तायडे हा दुपारी ४ वा.सुमारास परसाडे येथुन जळगांव येथे जाणेसाठी त्याचेकडील पल्सर मोटारसायकल वरून निघाला होता.माझ्या मयत सासुचे ३
दिवसाचा कार्यक्रम दि.३ रोजी असल्याने मी परसाडे येथेच राहण्याचा निर्णय घेतला होता. माझा लहान मुलगा तुषार याचे जवळ मोबाईल फोन नसल्याने मी मोठा मुलगा नितीन यास काल
दि.२ रोजी सायंकाळी ७ वाजेचे सुमारास फोन करून तुषार घरी पोहचला काय याबाबत
विचारले असता तो अद्याप पावेतो घरी पोहचलेला नसल्याचे मला माझ्या मोठ्या मुलाने सांगीतले.

मी परसाडे येथे असतांना मला रात्री ८:३२ वाजता माझ्या मोबाइल नं. ८८८८० ९६४४५ यावर एक अनोळखी नंबर ७५०७१७५११८ वरुन फोन आला व फोनवरील व्यक्तीने मला विचारले की,"तुम्ही तुषारचे वडील आहेत का" त्यावर मी त्यांना हो म्हणालो त्यांनतर त्या व्यक्तीने मला ग्रामीण रुग्णालय यावल येथे लवकर या तुमचा मुलगा
तुषार यास ऍडमीट केले आहे". असे सांगून त्याने फोन बंद केला. मी तसेच भाचा कुंदन झावरु बागुल याला घेवुन परसाडे येथुन लागलीच ग्रामीण रुग्णालय यावल येथे आलो तेथे मुलगा तुषार हा दवाखान्यात जनरल वार्ड मध्ये पलंगावर झोपलेला होता.त्याचेवर उपचार चालु होते,आम्ही त्याचे जवळ गेल्यानंतर त्याला विचारपुस करता त्यांने सांगीतले की सायंकाळी ६ वाजेचे सुमारास मी परसाडे येथुन माझी मोटारसायकलवरुन यावल मार्गे जळगाव जात असतांना यावल ते बोरावल रोडवर यावल गावाचे पुढे पाण्याचा पाटाचे पुलाजवळ माझ्या ओळखीचे राहुल
शांताराम सोनवणे,विक्रम पंडीत सोनवणे दोघे रा.जळगाव तसेच त्यांचे सोबत ६ ते ७ अनोळखी लोकांनी माझा रस्ता आडवून मला लाथाबुक्क्यांनी छाती-पोटावर तसेच व लाकडी काठीने दोन्ही पायांवर मारहाण केली आहे,मला
खुप त्रास होत आहे असे सांगीतले. डॉक्टरांनी त्यास पुढील उपचाराकामी जळगांव येथे घेवुन जाणे बाबत कळविल्याने आम्ही लागलीच त्यास ऍम्ब्युलन्स मध्ये जळगांव हॉस्पीटल येथे घेवुन निघाला.ऍम्ब्युलन्स मधुन जात
असतांना तुपारची तब्येत अचानक जास्त खराब झाली ऍम्ब्युलन्स मधील डॉक्टरांनी त्याला ऑक्सीजन लावला होता परंतु त्याचे तब्येत मध्ये काहीच सुधारणा होत नव्हती मुलगा तुषार यास सिव्हील हॉस्पीटल जळगांव येथे
आणल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यास ऍडमीट करुन त्याचेवर उपचार सुरु केले त्याचेवर उपचार चालु असतांना आज दि.३ रोजी १ वा. सुमारास डॉक्टरांनी त्यास मयत घोषीत केले त्यानंतर डॉक्टरांनी मयत मुलगा तुषार याचे प्रेत पी.ए.रूम मध्ये ठेवले आहे.मी माझ्या नातेवाईकांसोबत यावल पोलीस स्टेशनला फिर्याद
देण्यास आला.माझा मुलगा तुषार चंद्रकांत तायडे याने व त्याचा मित्राने विक्रम सोनवणे व राहुल सोनवणे यांना इन्स्टाग्रामवर शिवीगाळ करण्याचा व्हीडीओ बनवुन टाकला होता त्याचा राग मनात ठेवुन विक्रम सोनवणे व राहुल सोनवणे व त्याचे सोबत ६ ते ७ जणांनी मिळुन मुलगा तुषार यास यावल ते शेळगांव बॅरेज कडे रोडने यावल शिवारातील पाटाजवळ मारहाण केली त्याला मारहाणीत झालेल्या गंभीर दुखापती मुळे तो मरण पावला आहे. विक्रम
पंडीत सोनवणे, राहुल शांताराम सोनवणे दोघे रा. जळगांव व त्याचे सोबत ६ ते ७ जणांनी माझा मुलगा तुषार चंद्रकांत तायडे वय- १९ वर्षे याचा खून केला आहे. म्हणुन माझी त्यांचे विरुध्द कायदेशीर फिर्याद आहे यावरून यावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात