नितीन बानगुडे पाटलांच्या जाहीर सभेमुळे मतदारांच्या मनात "मशाल" चिन्हाचा प्रवेश. यावल नगरपरिषद निवडणूक.



यावल दि.१
काल रविवार दि.३० रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास यावल शहरात बोरावल गेट भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेl पक्षाचे उपनेते व सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक नितीन बानगुडे पाटील यांची जाहीर सभा झाली.

जाहीर सभेत त्यांनी सांगितले की महायुती ही सत्तालोलुप आहे कारण महाराष्ट्र सरकारचे राज्यात नगरपरिषदांसाठी ३० हजार कोटी रुपये वार्षिक बजेट आहे.यापैकी यावल नगरपरिषदेला अंदाजे १०० ते ५०० कोटी रुपयांची निधी मिळणार असल्याने या निधीतूनपाणी,घनकचरा,शाळा,
आरोग्य, इत्यादी माध्यमातून ठेकेदार,टेंडर धारक,
मालपुरवठादार व्यवस्थापन माध्यमातून हा फंड खिशात यायला पाहिजे या हेतूने महायुतीला सत्ता हवी आहे आणि ती सत्ता मिळवण्यासाठी ते कोणत्याही मार्गाचा अवलंब करू शकतात. असा आरोप नितीन बानगुडे पाटलांनी करून त्यांनी महाविकास आघाडीचे विकास कामांचे ध्येय उद्दिष्ट मतदारांसमोर ठेवल्याने यावल शहरातील मतदारांमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी असलेल्या उमेदवार सौ.छाया पाटील तसेच प्रत्येक प्रभागात नगरपरिषद सदस्य पदासाठी महाविकास आघाडी तर्फे रिंगणात असलेले उमेदवारांच्या 'मशाल व व पंजावर मतदान करण्याचे आव्हान केल्याने मतदारांच्या मनात मशाल व पंजा चिन्हाचा प्रवेश झाल्याने यावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ.छाया पाटील आणि प्रत्येक प्रभागात उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार असल्याचे वातावरण निर्मिती झाली आहे.
यावल नगरपरिषदे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची शारीरिक उंची, व विकास कामांची यादी,दांडगा जनसंपर्क इत्यादी बाबी लक्षात घेता लहान मूर्ती किती महान असल्याचे उदाहरण देऊन त्यांनी अल्पावधीत केलेल्या विकास कामांचा फायदा लोकनियुक्त अध्यक्ष पदासाठी असलेल्या उमेदवार सौ.छाया पाटील यांना मतदार त्यांच्या मतदानाच्या माध्यमातून करून देणार असल्याची चर्चा मतदारांमध्ये आहे. 

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ छायाताई पाटील आणि नगरसेवक पदाचे उमेदवार अतुल पाटील यांच्या प्रचारार्थ आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ मेळावा जाहीर सभा घेण्यात आली. जाहीर सभेत सर्व पदाधिकारी शिवसेना व युवासेना पदाधिकारी तसेच मित्र पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविकास आघाडीला प्रचार करताना मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना यावल शहरात १ वेळा आणि आमदार जावळे यांना १ वेळा अशी २ वेळा जाहीर सभा घ्यावी लागली, यातच मतदारांनी राजकीय वस्तुस्थितीचा आढावा लक्षात घेतल्याने भारतीय जनता पार्टीचे लोकनियुक्त अध्यक्ष पदाच्या महिला उमेदवार व नगरसेवक निवडून येण्यासाठी एका मंत्र्याला १ वेळा आणि आमदार जावळे यांना १ वेळा जाहीर सभा घ्यावी लागली याबाबत यावल शहरात ठिकठिकाणी चर्चा आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात