प्रचारतोफांचा प्रभाव वाढल्याने मंगळवारी "मशाल" साठी मंगलमय वातावरण. यावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक.

यावल दि.३०
यावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना (उभाठा) व महाविकास आघाडीचे उमेदवार सौ.छाया अतुल पाटील,भाजपाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ. रोहिणी फेगडे,शिवसेनेच्या सौ. स्वाती पाटील,अपक्ष उमेदवार सुलेमानी शबानाबी यांच्यासह एकूण ११ प्रभागातील राजकीय व अपक्ष उमेदवारांच्या प्रचार तोफांचा प्रभाव वाढला असला तरी मंगळवार दि. २ डिसेंबर २०२५ रोजी म्हणजे मतदानाच्या दिवशी "मशाल" चिन्हासाठी मंगलमय वातावरण निर्मिती झाली असल्याची चर्चा यावल शहरातील मतदारांमध्ये सुरू झाली आहे.

शिवसेना ( उभाठा ) व महाविकास आघाडी तर्फे अनुभवी असलेले तसेच विकासाचा चेहरा आणि सर्वसामान्यांच्या विश्वासास पात्र ठरलेले आणि सर्व स्तरातील नागरिकांच्या सतत संपर्कात राहून अडीअडचणी सोडवणारे प्रभाग क्र.११ ' ब ' मधील महाविकास आघाडी तथा उभाठाचे उमेदवार अतुल पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उभाठाचे उमेदवार सौ.छाया अतुल पाटील यांनी गेल्या २० ते २५ दिवसात " होम टू होम "प्रचार केला व त्यानंतर महाविकास आघाडीचे बहुसंख्य पदाधिकारी,कार्यकर्ते,समाजसेवक, हितचिंतक तरुणांसह प्रचार केला त्यात त्यांना यावल शहरातील विविध विकास कामांसाठी आणि उज्वल भविष्यासाठी सर्व स्तरातील मतदारांकडून उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला आहे.त्यामुळे मंगळवार दि.२ डिसेंबर २०२५ हा मतदानाचा संपूर्ण दिवस त्यांच्यासाठी मंगलमय ठरणार असल्याने मतदार त्यांना प्रचंड मतांनी निवडून देणार असल्याची संपूर्ण ११ प्रभागातील मतदारांमध्ये सार्वजनिकरित्या चर्चा आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात