मतदानाचे नुकसान होईल या हेतूने अध्यक्षपदाच्या महिला उमेदवारासह पतीची बदनामी. अदखलपात्र गुन्हा दाखल.

यावल दि.३०
यावल नगरपरिषद निवडणुकीत लोकनियुक्त अध्यक्ष पदाच्या उमेदवार छाया पाटील यांच्यासह प्रभाग क्र.११ ब मधील न.पा. सदस्यपदाचे उमेदवार तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची बदनामी होऊन मताचे नुकसान होईल या उद्देशाने व्हाट्सअप ग्रुप वर बदनामी केल्याच्या कारणावरून तक्रार दिल्याने यावल पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला.

माजी नगराध्यक्ष तथा निवडणूक रिंगणातील उमेदवार अतुल पाटील यांनी दि. ३० नोव्हेंबर रोजी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की दुपारी बारा वाजेच्या सुमारास यावल तालुका विचारवंत या व्हाट्सअप ग्रुपवर राजकीय बदनामी होण्याचे उद्देशाने तसेच निवडणुकीत पती-पत्नीच्या (अतुल पाटील व लोकनियुक्त अध्यक्ष पदाच्या उमेदवार त्यांच्या पत्नी छाया अतुल पाटील ) मताचे नुकसान होईल या उद्देशाने एका अज्ञात व्यक्तीने नाव माहित नाही परंतु मोबा.नं. ९२ ७० ७४ १७ ९७ धारकाने शहरातील नगरपालिकेच्या भूखंडाचा श्रीखंड खाणारा कोण या मथळ्याखाली ७ / १२ उतारा टाकून राजकीय हेतूने बदनामी केलेली आहे व नगरपालिकेच्या निवडणुकीत पती-पत्नीची प्रतिमा मलीन करून राजकीय बदनामी करण्याचे उद्देशाने पोस्ट टाकली वगैरेची फिर्याद दिल्यावरून यावल पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला यामुळे यावल तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून निवडणुकीतील प्रचाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून बदनामी करणाऱ्या समर्थकांच्या पायाखालची राजकीय वाळू सरकल्याची चर्चा आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात