यावल दि.१५
भुसावळ जंक्शन असलेल्या शहरात आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या ५० ते १०० फूट अंतरावर असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स मध्ये दररोज रात्री ८ ते १२ ते १ वाजेपर्यंत दारू पिणाऱ्यांचा,मध्य प्राशन करणाऱ्यांचा दैनंदिन कार्यक्रम आणि गोंधळ सर्रासपणे सुरू आहे याकडे पोलिसांच्या गोपनीय विभागासह भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने व्यापारी वर्तुळात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की भुसावळ शहरात रेल्वे स्टेशन रोडवर लोखंडी पुलाजवळ भर चौकात असलेल्या भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन बाजूला असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स मध्ये विविध प्रकारची दुकाने आहेत यात विशेष म्हणजे प्रसिद्धी माध्यमांची कार्यालय सुद्धा आहेत अशा या कॉम्प्लेक्स मध्ये दररोज रात्रीच्या वेळेस दारू पिणाऱ्यांचा मोठा गोंधळ सुरू होत असतो त्या ठिकाणी दारू पिण्याचा एक मोठा अड्डा ठिकाण झाला आहे.प्रसिद्ध प्रख्यात अशा कॉम्प्लेक्स मध्ये एखाद्या वेळेस फार मोठी अप्रिय घटना घडवून,मद्यपी दारूच्या नशेत काहीही करू शकतात चोरी
चपाट्या किंवा, भांडणातून हाणामारी खून इत्यादीसह तसेच अत्यंत वर्दळीचा रहदारीचा रस्ता असल्याने एखाद्या वेळेस छेडखानी,बलात्कार सारख्या घटना घडून कॉम्प्लेक्सला दिलेल्या नावाची बदनामी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे तरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या यांच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण पोलीस यंत्रणेसह लोकप्रतिनिधींनी वेळीच ठोस निर्णय घेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स मध्ये रात्रीच्या वेळेस दारू पिणाऱ्यांचा अड्डा उध्वस्त करण्याची तात्काळ कारवाई करावी अशी मागणी संपूर्ण भुसावळ शहरातून होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा