यावल दि.६
निसर्गाच्या नियमाप्रमाणे ७ जूनला पावसाळा सुरू होतो परंतु तब्बल एक महिना आधी निसर्गाने तथा वरूण राजाने पावसाळ्याची पूर्व सूचना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाताट आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाने दणक्यात यावल तालुक्याला दिली.
यावल शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडा मध्ये आज मंगळवार दि. ६ मे रोजी संध्याकाळी ५:४५ ते सात वाजेच्या दरम्यान झाला. सोसाट्याचा वारा असल्याने काही ठिकाणच्या घरावरील पत्रे व काही हलक्या वस्तू वादळी वाऱ्यामुळे उडाल्या असल्या तरी मोठ्या प्रमाणात कोणाचे आर्थिक किंवा जीवित हानीचे नुकसान झालेले नाही एवढी निसर्गाची कृपा झाली, तसेच मे महिन्यात पहिल्या आठवड्यात अति उष्णतेच्या तापमानात मात्र नागरिकांना मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे थंड वातावरणाचा काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी तालुक्यात कुठे काही नुकसान झाल्याची माहिती अद्याप महसूल करून मिळालेली नाही.
दहिगाव भागात जोरदार वादळी पावसाने अनेकांचे घरे उध्वस्त दहिगाव ता यावल येथे व परिसरात आज दिनांक ६ रोजी सायंकाळी जोरदार वादळी पाऊस झाला यात अनेकांच्या घरावरिल पत्रे उडून घरे उध्वस्त झाली तर मका केळी, उन्हात वाळत घातलेल्या भुईमूग शेंगांचे नुकसान झाले यात अनेक ठिकाणी झाडे उकळून पडले आहेत विजेच्या तारा तुटलेल्या आहेत त्यामुळे वीज पुरवठा खंडित झालेला आहे दहिगाव येथील पत्रकार जीवन चौधरी यांचे घरातील नुकसान झाले आहे घरावरील पत्र उडाल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले तरी पंचनामा करून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी परिसरातून होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा