यावल दि.१२
तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी कृषी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी वेळेवर बऱ्याच वेळा कार्यालयात उपलब्ध राहत नसल्याने शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन मिळत नसल्याने तसेच शेतकरी आणि तालुका कृषी अधिकारी यांचा संपर्क समन्वय पाहिजे त्या प्रमाणात नसल्याने आणि खरीप हंगाम पूर्वी नियोजन आढावा म्हणजे तालुका कृषी अधिकारी हे तहान लागल्यावर विहीर खोदायला लागल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.
महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त यांनी दि.३० एप्रिल २०२५ रोजी दिलेल्या सूचनेनुसार तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दि. १ ते १५ मे २०२५ या कालावधीमध्ये मा. पालकमंत्री महोदय यांच्या
अध्यक्षतेखाली खरीप हंगाम २०२५ च्या नियोजनासाठी आढावा बैठका आयोजित करावयाच्या आहेत.सदर बैठकांमध्ये खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना लागणारे गुणवत्तापुर्ण बियाणे,खते,किटकनाशके इ. निविष्ठा,कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाच्या विविध मोहिमा राबविण्याचे तंत्रज्ञान व संलग्न विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरावर सर्व संबंधित लोकप्रतिनिधी व संलग्न विभागाचे अधिकारी यांचे उपस्थितीत खरीप हंगाम २०२५ च्या नियोजनाकरिता आढावा बैठका आयोजित करावयाच्या आहेत.याशिवाय ग्रामस्तरावर कृषि विभागाच्या विविध योजना उपक्रम / मोहिमा इत्यादींचे नियोजन व प्रगतीबाबतची माहिती
कृषि विभागामार्फत देण्यात येत आहे.तसेच मा.आमंदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर खरीप हंगाम २०२५ च्या नियोजनाकरिता आढावा बैठका घेण्याबाबत देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत.
खरीप हंगाम २०२५ च्या नियोजन आढावा बैठकीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळण्यासाठी अनेक विषय दिले आहेत.त्यानुसार आतापर्यंत यावल तालुका कृषी अधिकारी यांनी गेल्या वर्षभरात काय काय मार्गदर्शन केले..? आणि शेतकऱ्यांच्या माहितीसाठी कोणती कोणती प्रसिद्ध कोणत्या वेळेला केली..? याबाबत शेतकऱ्यांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक घेण्याचे उद्दिष्ट नियोजन चांगले असले तरी शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे परंतु यावल तालुका कृषी अधिकारी हे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संपर्कात राहत नसल्याने त्यांना महत्त्वाच्या सूचना आणि मार्गदर्शन केव्हा करतात हे कोणालाही समजायला मार्ग नाही.तरी जिल्हाधिकारी जळगाव, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि यावल तहसीलदार यांनी यावल तालुका कृषी अधिकारी हे शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांना शेतीविषयक अनेक योजनांची माहिती वेळेवर देतात किंवा नाही..? किंवा कृषी अधिकारी हे फक्त कागदोपत्री शेतकऱ्यांच्या संपर्कात आहेत काय याची चौकशी करून कार्यवाही करावी अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा