यावल दि.१७
ऐतिहासिक घडलेल्या घटना सर्व स्तरातील नागरिकांच्या मनात, हृदयात चिरकाल टिकून राहण्यासाठी श्री छत्रपती संभाजी राजे यांची जयंती साजरा करण्याचा कौतुकास्पद निर्णय यावल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण तडफदार कार्यकर्त्यांनी घेतला आहे आणि तशा सक्रिय हालचाली सुरू केल्याची माहिती यावल तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष आकाश चोपडे यांनी दिली.बुधवार दि.१६ रोजी माननीय माजी मंत्री तथा आमदार अनिल दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यावल शहरात छत्रपती संभाजी राजे यांची जयंती धुमधडाक्यात साजरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्यामार्फत सूचनेनुसार तत्काळ जिल्हाधिकारी आयुष आयुष प्रसाद यांना आम्ही लेखी निवेदनाद्वारे विनंती केली असता त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी सकारात्मक चर्चा केली त्यानुसार पोलीस अधीक्षक श्री छत्रपती संभाजी राजे यांची जयंती साजरी करण्याबाबत लवकरच कळविणार असल्याचे सांगितले.याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना युवक तालुकाध्यक्ष आकाश चोपडे,युवक जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील,युवक शहराध्यक्ष योगेश पाटील,प्रेम देवरे,भगवान कोळी यांनी लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे



टिप्पणी पोस्ट करा