किनगाव येथे मंगळवारी आई भवानी मातेचा मोठा यात्रोत्सव. १०० वर्षाची परंपरा कायम.

यावल दि.२०
तालुक्यातील किनगाव येथे सालाबादाप्रमाणे यावर्षी ही मंगळवार दि.२१ जानेवारी२०२५ रोजी आई भवानी मातेचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.किनगाव हे यावल तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वात मोठे बाजारापेठेचे गाव असुन किनगाव येथील यात्रेला १०० वर्षांची परंमपरा आहे व परीसरातील सर्वात मोठी यात्रा येथे भरते या यात्रोत्सवा दरम्यान सकाळी ८:३० वाजता महादेव मरिमाता मंदिरापासून मिरवणूकीला प्रारंभ केला जाणार आहे.ही मिरवणुक किनगाव खुर्द किनगाव बुद्रुक या दोन्ही गावांतील सर्व राजकीय व सामाजिक तसेच सर्व धार्मिक वरिष्ठ पुरुष व महिला व नवनियुक्त यात्रोत्सव येथ कार्यकारणीच्या उपस्थितीत पार पडणार आहे.सदर तसेच गावातील मुख्य रस्यावर वाहातुकीला अडचन येऊ नये म्हणून यात्रोत्सव गेल्या वर्षी प्रमाणे स्टेट बँकेच्या मागे बाजीराव नगर येथे भरवण्यात येणार असुन येथे महीलांना संसारउपयोगी वस्तू खरेदीसाठी दुकाने, खेळण्यांची दुकाने,शेव चिवडयाची दुकाने इ.सह विविध वस्तूंची दुकाने लागणार आहेत तरी सर्व पंचक्रोशीतील नागरिक व किनगाव ग्रामस्थ यांनी भवानी मातेच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन बैठकीत किनगाव येथील समस्त यात्रोत्सव समिती व किनगाव ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.भवानी मातेची पूजा माजी प.स.चे सदस्य प्रशांत पाटील व सरपंच सौ.भारतीताई पाटील या दाम्पत्याच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. यात्रा उत्सवाची जय्यत तयारी सोमेश्वर पाटील,समाधान पाटील,संदीप पाटील,अनिल पाटील,राहुल पाटील,
प्रशांत पाटील,जितेंद्र पाटील,पप्पू पाटील,
राकेश पाटील,मोहन पाटील,संजय पाटील,
ऋषिकेश मोरे,प्रज्वल बारी,दिगंबर पाटील,उखा भाऊ जाधव इ.सह अनेकग्रामस्थ जय्यत  तयारीला लागले आहेत.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात