गेल्या वर्षी प्रभू श्री रामलल्ला आगमन आणि प्राणप्रतिष्ठा झाल्या निमित्त मिरवणुकीसाठी परवानगी मिळणार...?



यावल दि.२० 
दर्शन... वत्सलतेचे, मातृ - पितृ भक्तीचे,त्यागाचे,सत्यवचनाचे, संस्कृतीचे,आदर्श संस्काराचे, मर्यादा पुरुषोत्तमाच्या सहिष्णुतेचे अशा सात्विक प्रभू श्रीरामललाचे आगमन आणि प्राणप्रतिष्ठा तसेच मंदिर निर्माणनिमित्त गेल्या वर्षी सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ रोजी आपल्या भारतातील अयोध्या येथे भरगच्च असा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आहे. 
या भव्य अध्यात्मिक,धार्मिक सोहळ्याची,
कार्यक्रमाची,परंपरा कोट्यावधी भारतीयांच्या,भाविक नागरिकांच्या हृदयात आहे आणि कायम राहण्यासाठी तसेच शतकांनुशतके श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आठवणीत राहण्यासाठी व परंपरा टिकून राहण्यासाठी संपूर्ण भारत देशात दि.२२ जानेवारी २०२५ या वर्षापासून दरवर्षी ठीक ठिकाणी भव्य अशा मिरवणुका काढल्या जाणार आहेत आणि यासाठी शासनाने आपल्या पोलीस दलामार्फत रीतसर परवानग्या द्यायलाच पाहिजे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे आणि यासाठी देशातील,राज्यातील, जिल्ह्यातील,मतदारसंघातील संबंधित मंत्री,खासदार,आमदार यांनी आपल्या जनतेच्या,मतदारांच्या भावना लक्षात घेऊन परवानगीसाठी प्रयत्न करून श्रीराम सब के है,श्रीराम सबमे है... हे सिद्ध करून दाखवावे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात