यावल दि.३
पी एस एम एस स्कूल बामणोद येथे आयोजित स्काऊट गाईड निसर्ग निवास शिबिर शिबिराचे आयोजन करण्यात आले यात शिबिराचे उद्घाटन चेअरमन डॉ.जे.डी.भंगाळे यांनी केले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शाळेचे मुख्याध्यापक जे.एम.नेवे,
बौद्धिक क्षेत्राचे मार्गदर्शक डॉ.नरेंद्र महाले,पर्यवेक्षक आर. एस.अडकमोल उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच समाजसेवेच्या अनेक गुणांची जोपासना करणे आवश्यक आहे.तसेच आपल्या जीवनात प्रत्येक व्यक्तीमध्ये एक विशिष्ट अशा प्रकारची क्षमता असते.त्या क्षमतेचा वापर करून आपण आपले जीवन घडवू शकतो. स्काऊट गाईड हा नेहमी तत्पर असतो याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये नेहमी तत्परता असणे हे नितांत गरजेचे आहे त्याचबरोबर शालेय जीवनामध्ये सकारात्मक विचारांचे पेरण होणे सुद्धा आवश्यक आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी आपल्या ध्येयाच्या दृष्टीने प्रयत्नात सातत्य ठेवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉक्टर महाले यांनी केले.समाजसेवे बरोबरच मन मेंदू आणि मनगट ही व्यक्तीच्या विकासाची बलस्थाने आहे यावरही डॉ.महालेंनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या प्रसंगी डी.एन.राणे व एस.एस.पाटील या शिक्षकांनी स्काऊट गाईडचे जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनी झांबरे तर आभार सविता सुरवाडे यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.



टिप्पणी पोस्ट करा