यावल दि.८
७ /१२ उताऱ्यावर नाव लावून देण्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथील तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे वय ४२ यांने संबंधितांकडून आपल्या पट्टरच्या माध्यमातून ५ हजार रुपये लाच स्वीकारल्याने जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पथकाने रंगेहाथ पकडून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची घटना आज बुधवार दि.८ जानेवारी २०२५ रोजी घडल्याने मुक्ताईनगर महसूल परिसरासह भुसावळ विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांचे आजोबाचे नावाने कुऱ्हा तालुका मुक्ताईनगर येथे शेत गट क्र.१६७/१८ असा असून तक्रारदार यांच्या आजोबा हे सण १९९७ मध्ये मयत झाले आहे तेव्हा पासून तक्रारदार यांचे वडील, काका,आत्या व मयत काकाच्या मुलांचे ७/१२ उताऱ्यावर नाव लावणे बाकी होते त्यासाठी तक्रारदार यांनी मागील ७ ते ८ दिवसापूर्वी कुऱ्हा गावातील तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे यांनी यांनी तक्रारदार यांना तुम्हाला प्रत्येक वर्षाचे २२० रुपये याप्रमाणे ६ हजार रुपये शासकीय फी भरावी लागेल जर तुम्हाला शासकीय फी भरायची नसेल तर मला ५ हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले होते त्याबाबत यातील तक्रारदार यांनी दि.१ जानेवारी २०२५ रोजी जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची दि.१ जानेवारी २०२५ रोजी पडताळणी केली असता यातील तलाठी प्रशांत ढमाळे व खाजगी पंटर अरुण शालिग्राम भोलानकर वय ३२ राहणार कुऱ्हा यांनी तक्रारदार यांचे ७ / १२ उताऱ्यावर त्याचे वडील, काका,आत्या व मयत काकाच्या मुलाचे नाव लावण्याचे मोबदल्यात ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
त्यानंतर आज बुधवार दि.८ जानेवारी २०२५ रोजी सदर लाच रक्कम ५ हजार रुपये ही खाजगी पट्टर संतोष प्रकाश उंबरकर रा.
कुऱ्हा याने स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले या तिघं आरोपीता विरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील तपास लाच लूचपत प्रतिबंधक विभाग जळगाव पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पोलीस पथक करीत आहे. या कारवाईमुळे संपूर्ण भुसावळ महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून विभागातील काही मोजक्या तलाठी कर्मचाऱ्यांच्या शासकीय कामकाजाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा