यावल दि.१९ ( सुरेश पाटील )
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान यावल महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा कार्यक्रमाचे उद्घाटन प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा.एम.डी. खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला.
यावेळी महाविद्यालयाचे प्रमुख वक्ते प्रा.सोनाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना 'मायबोली' मराठीचे स्थान या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की मराठी ही महाराष्ट्र आणि गोवा या राज्याची मातृभाषा आहे. ती इतर राज्यातही वापरली जाते.मराठी भाषेचा उगम ९ व्या शतकात झाला. १२ व्या शतकात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ( भावार्थदीपिका ) हा मराठीतला पहिला ग्रंथ लिहिला मराठी भाषा बोलायला रसाळ आहे.मराठीतील साहित्य संपदा मोठी आहे.कवी सुरेश भट,कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.मराठी ही ज्ञान संस्कारशील शिदोरी आहे.असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की मराठीला ५२ पोटभाषा आहेत. महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागात वेगवेगळ्या बोली बोलल्या जातात भाषा दर बारा कोषागार बदलते परंतु मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे सार्वजनिक जीवनात संवाद साधण्यासाठी शुध्द मराठी बोलले पाहिजे मराठी पंधरवाडा कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात कविता, निबंध,अर्ज, संवाद,पत्र लेखन करणे हे विद्यार्थी हिताचे घटक आहेत त्यामुळे शुध्द लेखन केले पाहिजे वाचन करताना निरिक्षण वृत्ती जोपासली तर शुध्द लेखनाच्या चुका होत नाही.असे सांगताना मराठीतील जेष्ठ साहित्यिक म.सु.पाटील,यशवंत पाठक,खलील मोमीन यांनीही विपुल लेखन केले आहे असे डॉ. कापडे यांनी सांगितले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कु.दीक्षा पंडित हीने केले तर आभार मिलिंद बैरागी याने मानले यावेळी कार्यक्रमाला डॉ हेमंत भंगाळे,प्रा.सुभाष कामडी,प्रा.रामेश्वर निंबाळकर,
प्रा.हेमंत पाटील,प्रा.प्रशांत मोरे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे,संतोष ठाकूर (ग्रंथपाल),.दशरथ पाटील यांच्यासह महाविद्यालयीन सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा