यावल दि.९
यावल शहरातील नागरिकांच्या विविध समस्या,अडीअडचणी सोडविण्यासाठी यावल नगर परिषदेने प्रत्येक वार्डात बैठका सुरू केल्या.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये आणि यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या सूचनेनुसार आरोग्य अभियंता सत्यम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि. ९ जानेवारी २०२५ पासून यावल शहरात यावल नगरपरिषदेच्या वतीने वार्ड निहाय बैठकीचे आयोजन करण्यात आले.त्यात शहरातील वार्ड नंबर १ व वार्ड नंबर २ या भागातील महाराणा प्रताप नगर पंचशीलनगर श्रीरामनगर सईदपुरा,इस्लामपुरा व या भागातील नागरिकांकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नगरपरिषदे कडून हा उत्तम उपक्रम राबविला जात आहे या उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य नागरिकाच्या समस्या जाणून त्या समस्यांची निवारण करण्याचे प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून यावल नगरपरिषद प्रशासनातर्फे केले जातील सदर उपक्रमात यावल नगरपरिषदेचे शहर समन्वयक श्रीमती स्नेहा रजाने,
मुकादम शेख मोबीन,प्र मुकादम श्रीमती कल्पना घारू व स्वच्छ भारत मिशनचे अजय मेढे संबंधित वार्डातील स्वच्छता कर्मचारी रितू तायडे,नीता गोजरे,शितल घारू व शेख मंजर यांची उपस्थिती होती नागरिकांना स्वच्छता विषयी काही समस्या असल्यास त्यांनी 9209240292 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा