यावल दि.६ सजग रहा आणि १०० टक्के मतदान करा देशासाठी राष्ट्रीय सुरक्षेसाठी देशाचा आणि राज्याचा राष्ट्रीय सण म्हणजे दि.२० नोव्हेंबर बुधवार २०२४ हा राष्ट्रीय सण आहे. त्यानिमित्ताने यावल शहरात शुक्रवार दि.८ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता सुदर्शन न्युज चॅनलचे प्रमुख,प्रखर वक्ता सुरेशजी चव्हाण के यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे.
लोकशाहीत मतदान रुपी अधिकार बजाविण्यासाठी संधी येणाऱ्या दि.२० नोव्हेंबर २०२४ बुधवार रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभेची निवडणूक आहे या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी संधी प्राप्त होणार आहे, यानिमित्त सजग रहो १००% मतदान देश हितासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी या विषयावर जनजागृती निमित्त राष्ट्रीय न्यूज चॅनेल सुदर्शन न्युजचे प्रमुख वक्ता श्री सुरेशजी चव्हाणके यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे तरी यावल तालुक्यातील राष्ट्रभक्त नागरिकांनी,तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावल येथील सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा