यावल दि.६
रावेर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार अमोल जावळें यांच्या रावेर यावल विधानसभा संवाद दौऱ्यात,अमोल जावळे यांनी यावल तालुक्यातील सातोद,कोळवद,वड्री,परसाळे,आणि यावल शहरांमध्ये प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधला असता महायुती सरकारने घेतलेल्या सर्वसमावेशक निर्णयांबद्दल सर्व स्तरातील जनतेत असलेला विश्वास नागरिकांच्या उत्स्फूर्त स्वागतातून स्पष्टपणे दिसून आला.
या प्रसंगी मोठ्या उत्साहात आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी फुलांची उधळण करत स्वागत केलं आणि महिलांनी औक्षण करत शुभेच्छा दिल्या.
दौऱ्यात,अमोल जावळे यांनी नागरिकांना निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले आणि रावेर यावल विधानसभा क्षेत्रात विकासाच्या 'कमळ' फुलवून आपल्या सेवेची संधी देण्याची विनंती केली.
प्रचार दौऱ्यात हिरालाल चौधरी, शरद महाजन,नरेंद्र नारखेडे,हर्षल पाटील,पांडुरंग सराफ,ललित चौधरी,सविता भालेराव,पंकज चौधरी,नितीन चौधरी,उमेश फेगडे, राकेश फेगडे,जयश्री चौधरी,
अजय भालेराव,उमेश पाटील,राजू काठोके,विष्णू पारधे,दीपक चौधरी,भरत पाटील,श्याम महाजन, कांचन फालक,सागर कोळी यांच्यासह भाजप महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी,कार्यकर्ते, तरुण मित्र आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा