अध्यात्म शिरोमणी श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचे आज यावलशहरात आगमन.


यावल दि.४
श्री क्षेत्र वेरुळ ता.रत्नपुर (खुलताबाद) जि. छत्रपती संभाजीनगर येथील जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या ३५ व्या पुण्यस्मरणार्थ श्री क्षेत्र जनशांती धाम,ओझरमिग ता.निफाड जि.नाशिक याठिकाणी दि.५ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२४ पासुन सुरु होणाऱ्या जनशांती धर्म सोहळा या कार्यक्रमाच्या निमंत्रणा निमित्त आयोजित भक्त फेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

         जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री.श्री 
१००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचे आज दि.५ नोव्हेंबर २०२४ मंगळवार रोजी 
रात्री ठिक १० वाजता यावल शहरातील श्री व्यास व श्रीराम मंदीर येथे आगमन होणार तेथे महाराजांचा 
मुक्काम राहील.व बुधवार दि.६ रोजी सकाळी ५ ते ८:३० वाजे पर्यंत प. पु.बाबाजींची नित्यनेम विधी आरती व प.पु. महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी यांचे प्रवचन होणार आहे.त्यानंतर महाराजांचे पुढील कार्यक्रमाकडे प्रस्थान होणार आहे.तरी सर्व पंचक्रोशितील सर्व भाविक भक्तांनी प.पु.स्वामी शांतिगीरीजी महाराज यांच्या प्रवचनाचा व दर्शनाचा
लाभ घ्यावा असे आव्हान समस्त जय बाबाजी भक्त परिवार यावल तालुका ( व्यासनगरी ) तर्फे करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात