जे.टी.महाजन सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न.


यावल दि.९
यावल येथील जे.टी.महाजन सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये गुरुवार दि.८ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व दणक्यात साजरा करण्यात आला.    
   स्नेहसंमेलन कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष मा.शरदभाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भालोद येथील मेडिकल ऑफिसर डॉ. फिरोज तडवी उपस्थित होते. तसेच संस्थेचे संचालक उल्हास निंबा चौधरी,सुहास महाजन, नितीन महाजन तसेच प्रभाकर अप्पा सोनवणे,डॉ.निलेश गडे, व शाळेचे प्राचार्या सौ.रंजना महाजन व प्राचार्य डॉ.किरण खेट्टे व तसेच आय.टी.आयचे प्राचार्य.गिरीश वाघूळदे उपस्थित होते.याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच शाळेच्या प्राचार्या यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
     या वार्षिक स्नेहसंमेलनात वेगवेगळ्या वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी लोकनृत्य, कोळीनृत्य,भांगडा अशा विविध नृत्यप्रकारांचे प्रदर्शन केले.
अशा प्रकारे वार्षिक स्नेहसमेलन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्या रंजना महाजन,प्राचार्य डॉ. किरण खेट्टे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत तळेले सौ.प्रीती भार्गव यांनी केले.तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.प्रेरणा भंगाळे यांनी केले.कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व आय.टी.आयचे सर्व शिक्षक यांचे अनमोल असे सहकार्य लाभले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात