जळगाव जिल्हाध्यक्ष दि.१८
सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत
कंत्राटदारा मार्फत करण्यात आलेल्या ३५ ते ६८ टक्के बिलो रकमेचे रस्ते,पूल,आर.आर.पिटू सोसायटी व अन्य कामांची सखोल चौकशी करण्यात यावी,या मागणीसाठी भारतीय जनसंसद मार्फत गडचिरोली येथे बुधवार दि. २१ फेब्रुवारी रोजी इंदिरा गांधी मुख्य चौकात एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कामे अत्यंत निकृष्ट व बोगस झालेली असून त्या कामांची चौकशी करणेसंदर्भात शासन, प्रशासनास वर्षभरापासून अनेकदा पत्रव्यवहार करूनही चौकशीला प्रारंभ झालेला नाही.आंदोलनात उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनसंसद जिल्हा अध्यक्ष विजय खरवडे व राज्य संघटक डाॅ.शिवनाथ कुंभारे यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा