यावल दि.१८
काल शनिवार दि.१७ रोजी यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून तलाठी ईश्वर साळुंके / कोळी,शाळेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन सर तसेच गोपाल महाजन,नितिन महाजन,शाळा सदस्य शशिकांत फेगडे तसेच शाळा सदस्य दिपक महाजन इत्यादि उपस्थित होते.सर्वात प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन पुष्पहार अर्पण करण्यात आले.
व दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर स्वागत गीत म्हणून प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले.स्वागत गीतानंतर मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे मॅडम यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन प्रमुख अतिथींचा आदर सत्कार करण्यात आला तद्नंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला.विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्ट असे सामूहिक नृत्य सादर करून कुशलतेने आपले कला कौशल्य सादर करून उपस्थितांचे लक्ष केंद्रित करून प्रेक्षकांची मने जिंकली.सर्वच विद्यार्थी या स्पर्धेमुळे शाळेत अत्यंत उत्साही व आनंदी वातावरण दिसून आले.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विशेष वाव मिळाला.सर्वात शेवटी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.वर्षा भूते,सौ.कुंदा नारखेडे , श्रद्धा साळुंखे,स्वाती भोईटे, झीनत शेख मॅडम व अर्चना चौधरी मॅडम यांनी केले.राजेंद्र महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत फेगडे सर तसेच सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी विशेष नियोजनबद्ध परिश्रम घेतले. अशा प्रकारे सरदार वल्लभ भाई पटेल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला .



टिप्पणी पोस्ट करा