तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या उपस्थितीत सरदार पटेल स्कूलमध्ये "स्पोर्ट्स डे " कार्यक्रम संपन्न.


यावल दि.१
यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज गुरुवार दि.१ फेब्रुवारी २०२४ रोजी यावल तहसीलदार सौ. मोहनमाला नाझीरकर यांच्या उपस्थितीत "स्पोर्ट्स डे " कार्यक्रम संपन्न झाला.
       येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये " स्पोर्ट्स डे " चा कार्यक्रम पार पडला तसेच आजपासून शाळेतील विविध क्रीडा स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर मॅडम तसेच शाळा सदस्य शशिकांत फेगडे सर इत्यादी प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले . सर्वात प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले .  तसेच सौ.शिला तायडे मॅडम यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे शाल,श्रीफळ व  गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी मशाल पेटवून जल्लोषात कार्यक्रमाचे उद्घाटनाने सुरुवात केली.तद्नंतर तहसीलदार मोहनमाला नाझीरकर शशिकांत फेगडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले व इयत्ता प्री - प्राइमरी च्या क्रीडा स्पर्धांना सुरुवात करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र महाजनसर  यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशांत फेगडे सर व सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग यांच्या  सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा साळुंखे मॅडम यांनी केले.अशाप्रकारे आजचा "स्पोर्ट्स डे " चा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व जल्लोषात पार पडला .

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात