मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील पाणी पुरवठा योजना व शासकीय विश्रामगृहच्या नुतन इमारतीचे लोकार्पण.

जळगाव दि. 20 (जिमाका)- 
पाळधी येथे  महाराष्ट्रातील पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या 22 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले.तसेच शासकीय विश्रामगृहाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
         यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार,पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील,उद्योग मंत्री उदय सामंत,ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन,खासदार उन्मेष पाटील आमदार सर्वश्री चिमणराव पाटील,राजू भोळे,विभागीय आयुक्त  राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया आदी उपस्थित होते.
            यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरणगाव येथे ट्रामा केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय उभारावे,अशी मागणी केली असता सदर ट्रामा केअर उभारण्या बरोबरच इतर आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी भरीव निधीची तरतुद करण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.
    जळगाव जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.पाळधी गावात 50 खाटांचे ट्रामा सेंटर,पाळधी पोलीस स्थानक,बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भव्य उद्यानाची उभारणी करणे,असोदा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक उभारणे,तसेच  इतर विकास कामांसाठी देखील सर्वतोपरी आर्थिक मदत करण्यात येईल.तसेच कोळी समाजाचे प्रश्न देखील प्राधान्याने सोडविले जातील असे त्यांनी यावेळी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Advertisement